राऊत, परब यांना पोलीस कोठडीत जावे लागेल; किरीट सोमय्यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:53 AM2022-02-12T00:53:35+5:302022-02-12T00:54:02+5:30
खासदार संजय राऊत व मंत्री अनिल परब यांची स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे.
पुणे : पुणे महापालिकेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच भाजपने जंगी स्वागत केलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काही वेळ पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये महापालिका आवरात येताना राडा झाला. पुणे महापालिकेत भाजपकडून पुणे महापालिकेत शक्तीप्रदर्शन अन घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसैनिकांनी गेल्या शनिवारी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांच्यावर केला होता हल्ला त्यामध्ये ते जखमी झाले होते. किरीट सोमय्या यांच्यावर ज्या शिवसैनिकांनी ठिकाणी हल्ला केला त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या याचा सत्कार केला. त्यानंतर पुणे शहरातील भाजप कार्यालयात त्यांनी सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांवर टीका केली आहे.
"खासदार संजय राऊत व मंत्री अनिल परब यांची स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, भ्रष्टाचाराचे पुरावे प्रचंड असल्याने त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शेजारील कोठडीत या दोघांना नक्की जावे लागेल, अशा शब्दांत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी घणाघात केला आहे. "
सोमय्या म्हणाले, ‘‘ ईडीच्या कोठडीत असलेला प्रवीण राऊत तपासात काय माहिती देईल या भीतीने संजय राऊत चिंतीत आहेत. आता अजित पाटकर जेलमध्ये गेले तर काय होणार असा प्रश्न पडल्याने ते घाबरले आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील माझा आणि माझ्या पक्षाचा लढा असाच सुरू राहणार आहे.'