भीमा पाटस साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार राहुल कुल यांना 'क्लिन चीट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:47 PM2023-07-28T15:47:02+5:302023-07-28T15:49:14+5:30

विधान परिषदेतील तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले....

sanjay raut 'Clean cheat' to BJP MLA Rahul Kul in Bhima Patas sugar factory scam case | भीमा पाटस साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार राहुल कुल यांना 'क्लिन चीट'

भीमा पाटस साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार राहुल कुल यांना 'क्लिन चीट'

googlenewsNext

पुणे : राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर आता भाजप आमदार राहुल कुल यांना राज्य सरकारने दिली क्लिन चीट दिली. दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत सरकारने ही क्लिन चीट दिली आहे. साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नाही, असे या अहवालात सांगण्यात आले.

२०२२-२३ चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नाही. परंतु, २०२१-२२ लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. यामध्ये आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तर, इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे .

संजय राऊतांचे आरोप-

भीमा पाटस कारखान्याची माती करणाऱ्या आमदार राहुल कुल यांना सोडणार नाही असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत दिला होता. वरवंड ( ता. दौंड) येथे शेतकरी कृती समितीच्या शेतकरी मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.  भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्याशी माझे वैयक्तिक भांडण नाही. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी कारखान्याची वाट लावली ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. माझ्याकडे आलेल्या कागदपत्रानुसार राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात छोट्या-छोट्या गोष्टीत पैसे खाल्ले आहे. मात्र हा भ्रष्टाचाराविरोधातील लढा मी थांबवणार नाही. त्यांच्या विरोधात सीबीआय कडे तक्रार केली आहे. भविष्यात, ईडी आणि उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. 

Web Title: sanjay raut 'Clean cheat' to BJP MLA Rahul Kul in Bhima Patas sugar factory scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.