संजय शिरसाट अडचणीत; सुषमा अंधारेंकडून पुण्यातील कोर्टात ३ रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:16 PM2023-04-03T13:16:00+5:302023-04-03T13:27:19+5:30

जोपर्यंत शिरसाटांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, सुषमा अंधारेंची आक्रमक भूमिका

Sanjay Shirsat in trouble Sushma Andharen filed a claim for damages of Rs 3 in the court in Pune | संजय शिरसाट अडचणीत; सुषमा अंधारेंकडून पुण्यातील कोर्टात ३ रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

संजय शिरसाट अडचणीत; सुषमा अंधारेंकडून पुण्यातील कोर्टात ३ रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

googlenewsNext

पुणे: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करीत ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत; पण त्या बाईने काय- काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत,’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सुषमा अंधारे आज शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट  यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.  आज सकाळी साडेअकरा वाजता पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुषमा अंधारे यांच्यावतीने हा दावा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर केवळ तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

महिला आयोगाने शिरसाट यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. जोपर्यंत शिरसाटांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. आयोगाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून शिरसाट यांचे व्हिडीओ मागवले असून, त्यांचे वक्तव्य तपासून पुढचे निर्देश देण्यात येतील.

मंत्र्यांसाठी वापरला शब्द

‘लफडे’ हा शब्द मी आर्थिक घोटाळ्यासंदर्भात, माझ्या दोन मंत्र्यांसाठी वापरला. सुषमा अंधारेबद्दल मी चुकीचे बोललो नाही. ती स्वत:ला विद्वान समजते; पण कधी तरी निवडणूक लढली का?, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

Web Title: Sanjay Shirsat in trouble Sushma Andharen filed a claim for damages of Rs 3 in the court in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.