संजय वात्सायन ‘एनडीए’चे उप-कमांडंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:32+5:302021-03-04T04:19:32+5:30
पुणे : रियर अँडमिरल संजय वात्सयन, एव्हीएसएम, एनएम यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) उप-कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षकपद ...
पुणे : रियर अँडमिरल संजय वात्सयन, एव्हीएसएम, एनएम यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) उप-कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षकपद म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला.
अॅडमिरल वात्सयन यांनी एनडीएतूनच सन १९८६ मधून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याशिवाय डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन, इंडिया, नावल वॉर कॉलेज (मुंबई) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (नवी दिल्ली) येथूनही शिक्षण घेतले आहे.
भारतीय नौदलात वात्सायन १९८८ मध्ये रुजू झाले. महत्त्वाच्या युद्धनौकांवरील ‘गायडेड मिसाइल्स’ प्रणालीत विशेषतज्ज्ञ म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. आयएनएस म्हैसूर या युद्धनौकेवर त्यांनी विशेष अधिकारी म्हणून काम केले. अन्य विशेष जबाबदाऱ्यांमध्ये कोस्ट गार्ड आयपीव्ही, क्षेपणास्त्र वाहिन्या आयएनएस विभूती आणि आयएनएस नाशक, क्षेपणास्त्र कार्वेट आयएनएस कुथार आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आयएनएस सह्याद्री (चालक दल) यांचा समावेश आहे.