कलाकारांची मांदियाळी एका छताखाली आणतोय तरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 11:54 AM2019-09-08T11:54:53+5:302019-09-08T12:02:30+5:30

कलेच्या प्रांतात नवख्यांपासून ते प्रचलित अशा सर्वांना सहज काहीच उपलब्ध होत नाही. सांघिक पद्धतीनेच इथे प्रत्येकजण ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असतो.

sanket anagarkar culbture an art space in pune | कलाकारांची मांदियाळी एका छताखाली आणतोय तरुण

कलाकारांची मांदियाळी एका छताखाली आणतोय तरुण

googlenewsNext

दीपक कुलकर्णी 

पुणे - कलेच्या प्रांतात नवख्यांपासून ते प्रचलित अशा सर्वांना सहज काहीच उपलब्ध होत नाही. सांघिक पद्धतीनेच इथे प्रत्येकजण ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असतो. या दरम्यान सर्वांत जास्त परीक्षा होते ती नवख्या कलाकारांची. त्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुणे-मुंबई सारख्या शहरात येणाऱ्या कलाकारांना तर हा प्रश्न नेमका भेडसावतो. स्वत:च्या पोटाला चिमटा काढत व खिशाची झळ सोसूनही मंडळी कलेच्या प्रांतात नवं काही करू पाहतात. अशाच सर्व कलाकारांसाठी एक तरुण दुवा बनू पाहतोय, त्यांच्यासाठी जणू नवा पर्याय उभा करतोय... एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीच्या आधारे अवघ्या २१ वर्षांचा तरुण ‘क्लबचर’च्या ग्रुपखाली नवख्या, प्रचलित कलाकारांची एकत्रित भट्टी एका छताखाली आणू इच्छित आहे. संकेत अनगरकर असे युवकाचे नाव.

मूळचा लातूरचा पण गेल्या नऊ वर्षांपासून संकेत पुण्यात कुटुंबासह राहतो आहे. तो सध्या मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे तसाच तो पुरुषोत्तम स्पर्धेचा घटक देखील आहे. त्याने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमात क्लबचर ग्रुपची निर्मिती करत कलाकारांना एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. मित्राला सोबत घेत त्याने वेबसाईटचे काम हाती घेतले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून मोफत आणि सहज ऑनलाइन नावनोंदणी करत कलेचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून तो गीतकार, कॅमेरामन, फोटोग्राफर, चित्रकार, नृत्य, लेखक, संगीतकार, वादक, गायक, दिग्दर्शक, अभिनय कलाकार अशा सर्वांचा समावेश त्याच्या ग्रुपमध्ये असणार आहे. त्याच्या या अभिनव प्रयोगाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे. यातून कुठल्याही प्रकारे आर्थिक कमाईचा उद्देश नसल्याचे तो स्पष्ट करतो. त्याच्या या अभिनव प्रयोगाची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे. फक्त १५ रुपये खर्चात तयार झालेली ‘बाप्पा मोरया’ नावाची शॉर्टफिल्म त्याने नुकतीच या उपक्रमाचा भाग म्हणून यूट्यूबवर अपलोड केली आहे. तसेच येत्या 18 सप्टेंबरला त्याने सिम्बायोसिस आणि उदगार करंडकविजेत्या एकांकिकांच्या अभिवाचन कार्यक्रम ‘वाचन महोत्सव’ उपक्रमात आयोजित केला आहे.

नवखे कलाकार आणि त्यांच्या प्रयोगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाहिजे तसे कलाकार मिळणे ही देखील कलेच्या विश्वात अवघड बाब झाली आहे. त्यामुळे एका ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा अनेकांना जोडता त्यातून अगदी सहजप्रकारे मोठेमोठ्या अडचणींवर मात करता येते. तसेच योग्य मार्गदर्शन आणि नवनवीन कल्पनांच्या द्वारे अफाट काही निर्माण होऊ शकते. या ग्रुपमधील व्यक्तींचा व्यवहार हा वैयक्तिक स्वरुपात असेल.

- संकेत अनगरकर, संस्थापक, क्लबचर ग्रुप
 

Web Title: sanket anagarkar culbture an art space in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे