अतिवृष्टीने खरिपावर, तर अवकाळीने रब्बीवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:39+5:302021-01-09T04:09:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खरीप हंगामावर अतिवृष्टीने, तर रब्बी हंगामावर अवकाळी आणि ढगाळ हवामानाने संक्रात आणली आहे. गेल्या ...

Sankrant on Kharif due to heavy rains, and Rabbi on untimely rains | अतिवृष्टीने खरिपावर, तर अवकाळीने रब्बीवर संक्रांत

अतिवृष्टीने खरिपावर, तर अवकाळीने रब्बीवर संक्रांत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खरीप हंगामावर अतिवृष्टीने, तर रब्बी हंगामावर अवकाळी आणि ढगाळ हवामानाने संक्रात आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग पसरण्याची शक्यता असतानाच बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसाचा द्राक्ष, टोमॅटो, तरकारी पिके, कांदा या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.

रब्बीला फटका; वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान

आंबेगाव तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार मुसळधार पावसात रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्ष, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या पावसात वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

गुरुवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले. दुपारी एकच्या सुमारास आदिवासी भागात भीमाशंकर, तळेघर परिसरात पाऊस सुरू झाला. त्यानंतर दुपारी चारनंतर घोडेगावमध्ये पावसाने हजेरी लावली व सायंकाळी सहानंतर संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. हा मुसळधार पाऊस रात्रभर पडत होता. आंबेगाव तालुक्यात सरासरी ३४ मिमी पावसाची नोंद झाली. अजूनही वातावरणात प्रचंड गारवा असून परत पाऊस पडू शकतो अशी परिस्थिती आहे.

या पावसामुळे रब्बी हंगामातील पीक, भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यात गेली काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारत होते. त्यात आता पाऊस पडल्याने संपूर्ण पीक वाया जाणार आहे. कांदा लागवड दाट धुके, ढगाळ वातावरण व त्यात आता अवकळी पाऊस या कचाट्यात सापडली आहे. लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडू लागल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

08012021-ॅँङ्म-ि02 झ्र अवकळी पावसामुळे कलिंगडाच्या शेतात साचलेले पाणी

08012021-ॅँङ्म-ि03, 04 झ्र अवकळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे झालेले नुकसान

जुन्नर तालुक्यात

द्राक्षांचे १०० कोटींचे नुकसान

औषधफवारणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

खोडद : गुरुवारी सायंकाळी,रात्री व शुक्रवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसून औषधफवारणी मोठ्या वेगाने सुरू केली. द्राक्षबागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची शुक्रवारी दिवसभर लगबग पाहायला मिळाली.

गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ च्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटे ४ पासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे

द्राक्ष काढणीला आलेल्या बागांचे १०० टक्के नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहेत.

फोटो: अवकाळी पावसामुळे औषधफवारणीला वेग आला असून, द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. हिवरे तर्फे नारायणगाव येथील किरण भोर यांच्या बागेतील औषध फवारणीचे हे छायाचित्र.

अवकाळी पावसाने वीटभट्ट्यांचे नुकसान

कुरूळी : ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी व वीट व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तर न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तर या अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे देखील देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वीट भट्टी व्यावसायिकांची वीट झाकण्यासाठी तारांबळ उडाली होती. कुरुळी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते, त्यातच गुरुवार संध्याकाळी व आज दिवसभर चाललेल्या संततधार पावसाने वीट भट्टी वरील बनवलेल्या कच्च्या विटा या पावसामुळे वितळून माती झाली आहे.

छायाचित्र : कुरुळी परिसरात पावसाच्या भीतीने वीट उत्पादकांनी विटांवर प्लास्टिकचे कवर टाकले आहे.

बेल्हा:-बेल्हा (ता.जुन्नर)व परिसरात काल मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ते

बेल्हा, गुळुंचवाडी, आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा, बांगरवाडी, गुंजाळवाडी, साकोरी, मंगरुळ आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसाचे वातावरण दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वावरात कांदे काढून ठेवले होते. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले कांदे शेतात भिजून गेले. तर काही शेतकऱ्यांचे काढणीला आलेले कांदा पीक शेतातच सडतोय की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच मका आणि ज्वारीची उभी पिके पण भुईसपाट झाले आहेत. मागच्याच आठवड्यात ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यामुळे शेतपिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र दिसत होते.

फोटो:

Web Title: Sankrant on Kharif due to heavy rains, and Rabbi on untimely rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.