संस्कारपुष्प १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:13+5:302021-09-11T04:12:13+5:30
..................................... भगवान महावीरांनी अहिंसेला प्राणीमात्रांशी मैत्रीचे सूत्र असे सांगितले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’. मैत्री हा शब्द स्नेह, प्रेम, करुणा, दया, ...
.....................................
भगवान महावीरांनी अहिंसेला प्राणीमात्रांशी मैत्रीचे सूत्र असे सांगितले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’. मैत्री हा शब्द स्नेह, प्रेम, करुणा, दया, अनुकंपा आणि सेवेशिवाय अर्थपूर्ण असू शकत नाही. महावीरांनी मैत्रीच्या अंतर्भावाला खूपच व्यापकपणे पाहिले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’ला ‘वेरं मज्झं ण केणई’शी देखील जोडले. म्हणजे, मी सर्व जिवांशी मैत्री करतो. त्याचबरोबर माझे कोणाशीही वैर नाही. ही मैत्रीभावना फक्त मानवी जगापुरती मर्यादित नाही, असेही ते सुचवतात.
अहिंसा आणि मैत्री एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अहिंसा मैत्रीचा विस्तार आहे आणि मैत्री अहिंसेचा विस्तार आहे. सर्व धर्मांमध्ये अहिंसेची अवधारणा बीज स्वरूपात आढळते. यहुदी धर्मग्रंथामध्ये दहा आज्ञा नमूद केल्या आहेत त्यामध्ये तुम्ही कोणाचीही हत्या करू नका याचा उल्लेख आहे. जैनधर्म या गोष्टीच्यापुढे जाऊन असे म्हणत आहे- सव्वे सत्ता ण हंतव्वा....
परंपरेच्या प्रवाहात, अहिंसेचा शाब्दिक अर्थ केवळ हिंसा न करणे हाच झाला आहे. वास्तविक अहिंसेचा मूळ आधार करुणा, वात्सल्य आणि अनुकंपेपेक्षाही अधिक आहे. पृथ्वी, पाणी, वनस्पती, वायू, अग्नी यांच्या विनाशालासुद्धा जैन तत्त्वज्ञान हिंसा मानते. आपण हे देखील विसरून चालणार नाही की मानवी चेतना आणि विविध प्रकारची संवेदनशीलता अहिंसेच्या व्यापक अर्थाने प्रकट झाली आहे. जितकी अधिक संवेदनशीलता विस्तृत होईल, अहिंसेचा अर्थविकास तितका विकसित होईल.
- ʻअणुʼ शिष्य जिनेंद्रमुनीजी महाराज
(फोटो नाही)