संस्कारपुष्प २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:54+5:302021-09-08T04:16:54+5:30
संपत्ती, संतती, सत्ता या तीन गोष्टींप्रती आपल्या मनामध्ये अधिक प्रेम असते. देव धर्म, गुरू यांच्या प्रतीदेखील आपल्याला तितकेच प्रेम ...
संपत्ती, संतती, सत्ता या तीन गोष्टींप्रती आपल्या मनामध्ये अधिक प्रेम असते. देव धर्म, गुरू यांच्या प्रतीदेखील आपल्याला तितकेच प्रेम असायला हवे. संपत्ती, संतती, सत्ता याहून अधिक प्रेम जर तुम्ही देव, धर्म आणि गुरूंप्रती ठेवले, तर नक्कीच तुमची जीवनरुपी नाव पार होऊन जाईल. पण, सर्वांत आधी तुमच्या मनामध्ये या प्रती श्रद्धा आणि आस्था निर्माण होणे गरजेचे आहे. आस्था निर्माण झाली की अरिहंत तत्त्व, सिद्ध तत्त्व मिळते. तुमच्या आस्थेमध्ये मजबुती हवी, दृढता हवी. तुमच्या आस्थेमध्ये कोणताही स्वार्थ असू नये. केवळ आस्था हवी, श्रद्धा हवी. अरिहंत आपले देव आहेत. त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा, आस्था असावी. देव हमारे श्री अरिहंत, गुरू हमारे गुणीजन संत, धर्म हमारा दया अहिंसा, हे भंते हम पै दया रखना. देव, धर्म, गुरू यांच्या प्रती श्रद्धा असायलाच हवी. धर्म हे जीवनाचे सार आहे. धर्मामुळे आपले जीवनाचे सार्थ होते. धर्म हा पगडीप्रमाणे नसतो, जेव्हा हवा तेव्हा घेतला आणि नको असेल तेव्हा नको. धर्म हा दमडी प्रमाणे देखील नसावा जेव्हा हवा तेव्हा खिशात ठेवला, हवा तेव्हा खर्च केला. धर्म हा चमडीप्रमाणे असावा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोबत असेल. धर्म हा आयुष्यासोबत देखील असतो आणि आयुष्यानंतर देखील सोबत असतो.
- उपप्रवर्तक तारक ऋषिजी महाराज