संस्कारपुष्प २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:03+5:302021-09-09T04:15:03+5:30

................ कषाय म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्ती होय. कषाय जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळालेला असतो. या पर्वातील ...

Sanskarpushpa 2 | संस्कारपुष्प २

संस्कारपुष्प २

Next

................

कषाय म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्ती होय. कषाय जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळालेला असतो. या पर्वातील चौथा दिवस तुम्हाला हेच सांगतो तुमच्यामध्ये असलेले कषाय नष्ट करा. कषाय मिटवून टाका. कष म्हणजे जो तुम्हाला पकडून ठेवतो. ज्या क्षणाला कषाय संपतो त्या क्षणाला तुम्हाला मोक्ष मिळालेला आहे. क्रोध, मान, माय, लोभ हे चार कषाय आहेत. या चार कषायवर विजय मिळवा आणि मोक्षाची प्राप्ती करा. स्वत:चे आत्मपरीक्षण करा. चार कषायमधील पहिला कषाय क्रोध, दिवसभरात अनेकदा आपण मन-वचन-कायाद्वारे क्रोध करतो. एखाद्याप्रति असलेला राग, घृणा, अनादर म्हणजे क्रोध होय. जेव्हा मानव क्रोध करतो तेव्हा त्यांची बुद्धी नष्ट झालेली असते. दुसरे कषाय म्हणजे मान म्हणजे अहंकार होय. मान असलेल्या व्यक्तीला वाटते मी या जगात सर्वात मोठा आहे. बाकी जग खाली आहे. माया म्हणजे छल, कपट म्हणजे माया होय. क्रोध नष्ट होऊ शकतो, मान असलेला व्यक्ती झुकू शकतो. माया सुटायला हवी. लोभ हा कषायमधील सर्वात भयंकर प्रकार आहे. पापाचा बाप कोण असेल तर तो लोभ होय.

- प्रवर्तक तारकऋषिजी महाराज

Web Title: Sanskarpushpa 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.