संस्कारपुष्प २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:52+5:302021-09-10T04:15:52+5:30
................ संसारात अनेक वर्षापासून प्राणी परिभ्रमण करत आहेत. मानवाला अनेक वर्षापासून क्रोधापासून मुक्तता हवी आहे. क्रोध हा अग्नीप्रमाणे असतो. ...
................
संसारात अनेक वर्षापासून प्राणी परिभ्रमण करत आहेत. मानवाला अनेक वर्षापासून क्रोधापासून मुक्तता हवी आहे. क्रोध हा अग्नीप्रमाणे असतो. एका क्षणात सर्व काही नष्ट करतो. मानवाला चांगले कार्य करण्यासाठी अनेक वर्ष लागतात, पण क्रोध मात्र काही मिनिटांत अनेक वर्ष कमावलेले गमावतो. क्रोधामुळे माणसाचे स्वत:वरील नियंत्रण पूर्णपणे जाते व त्याच्या हातून चुका घडू लागतात व मग त्याला या चुकांचे परिणाम भोगावे लागतात. क्रोध हे अनर्थाचे मुळ आहे. मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा शत्रू हा क्रोध आहे. जेव्हा मानवास क्रोध येतो त्या वेळेस त्यांचे सर्व हावभाव, भाषा बदलते. क्रोधीत मानव क्रोधात अनेक चुकीच्या गोष्टी बोलून जातो. क्रोध हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. क्रोधाची सुरूवात मुर्खतेने होते व शेवट पश्चातापाने होतो.
क्रोध जर नकारात्मकतेमुळे निर्माण झाला असेल, तर कुठलीही व्यक्ती त्या क्रोधावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, कारण क्रोध ही "फलश्रुती" आहे. कुठल्या कारणांनी तुम्हाला राग येतो, क्रोध येतो, त्या कारणांना शोधून काढणे अतिशय गरजेचे आहे. लक्षात घ्या, "कारण" नष्ट केले म्हणजे "परिणाम" नष्ट होऊ लागतात आणि तुमच्या "क्रोधाचे" कारण होय. तुमच्या "चित्तातील नकारात्मक प्रवाह"जर तुम्ही नकारात्मक वृत्तीचे असाल, तर परिणाम स्वरूप तुम्हाला नेहमीच क्रोध येत राहील, परंतु जर तुम्ही सकारात्मक वृत्तीचे बनलात, तर आपोआपच तुमच्या नकारात्मकतेला आळा घातला जाईल. म्हणून तुम्ही क्रोधावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा क्रोध निर्माण होण्याचे मूळ कारण असलेल्या तुमच्या "नकारात्मक वृत्तीवर" नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक वृत्तीला नष्ट करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम नकारात्मक विचार करणे, बोलणे व ऐकणे बंद करा.
- प्रवर्तक तारकऋषिजी महाराज