संस्कारपुष्प २ - क्षमापना: पर्युषण पर्वाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:56+5:302021-09-12T04:14:56+5:30

माफी मागणे (क्षमापना) हे पर्युषण पर्वाचे प्राण आहे. क्षमापनेमध्ये अशी अट नसते की कोणी दुखावले गेले असेल तरच क्षमा ...

Sanskarpushpa 2 - Forgiveness: The life of Paryushan Parva | संस्कारपुष्प २ - क्षमापना: पर्युषण पर्वाचे प्राण

संस्कारपुष्प २ - क्षमापना: पर्युषण पर्वाचे प्राण

Next

माफी मागणे (क्षमापना) हे पर्युषण पर्वाचे प्राण आहे. क्षमापनेमध्ये अशी अट नसते की कोणी दुखावले गेले असेल तरच क्षमा करणे. आपल्याला दुःख झाले आहे त्या दुःखाच्या भावनेचे विसर्जन करणे हे खऱ्या अर्थाने क्षमापना आहे. आपल्या मनात क्षमापनाची भावना असते, पण चुकीच्या समजुतींमुळे ती भावना व्यक्त होत नाही. दुसऱ्याने तुमचे मन दुखावले आहे म्हणून तुम्ही दुःखी आहात, तुमची वेदना त्याठिकाणी योग्य आहे पण विचार करा की तुमच्यासाठी ही वेदना महत्त्वाची आहे की जीवन? तुम्ही वेदनांना सांभाळत राहाल तर तिथे फक्त दुःखच असेल. जर तुम्हाला या दुःखातून बाहेर पडायचे असेल तर सहा गोष्टींचा गांभीर्याने विचार करा आणि त्यांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करा. पहिली, तुमचे दुःख नेमके समजून घ्या. दुःख कोणी दिले, कधी दिले, का दिले, ते कसे दिलेॽ स्पष्टीकरण आपल्याला हे समजण्यास मदत करू शकते की दुःख जितके मोठे आहे, त्याचे कारण तितके मोठे नाही. दुसरी, तुमची कमजोरी मान्य करा. आपण दुःख विसरू शकत नाही, ही दुर्बलता आहे. तिसरी, तुम्हाला तुमच्या विचारांनीच दुःखी केले आहे. चार, कोणीतरी तुमची चूक माफ केली होती, आता क्षमा करण्याची पाळी तुमची आहे. पाच, ज्याने तुम्हाला दुःख दिले त्याच्या उपकारांचे स्मरण करा. सहा, क्षमा करण्याचे बळ प्रदान करण्यासाठी परमात्म्याकडे प्रार्थना करा. क्षमा तुम्हाला तुमचा दुःखी भूतकाळ विसरण्यास मदत करते.

- गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज

(फोटो आहे)

Web Title: Sanskarpushpa 2 - Forgiveness: The life of Paryushan Parva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.