संस्कारपुष्प ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:32+5:302021-09-11T04:12:32+5:30
...................................... अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींनी जगाला कर्मसिद्धांत दाखविले. कर्म हा जागतिक व्यवस्थेचा नियम आहे. जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. ...
......................................
अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींनी जगाला कर्मसिद्धांत दाखविले. कर्म हा जागतिक व्यवस्थेचा नियम आहे. जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. आपले अनुभव, कृती, विचार, भावना, मन, अवचेतन मन आणि चेतनेमध्ये परिवर्तित होतो. चेतना बदलल्याने मनही बदलते. कर्मामुळे आपण आपल्या चेतनेचे मूळ स्वरूप जाणू शकत नाही. कर्मापासून मुक्त होण्याचे दोन मार्ग आहेत - आत्मजागृती आणि निःस्वार्थ प्रेम. आत्मजागृतीच्या अनुपस्थितीत जगासोबत प्रेमाचा आभास होतो. जागतिक प्रेम स्वार्थी असते. त्यामुळे नकारात्मक कर्माचे आकर्षण होते. त्यावर मात करण्यासाठी निःस्वार्थ प्रेम आवश्यक आहे. कर्म ज्या भावाने बांधले गेले आहे नेमका त्याच्या विपरीत भावाने तो नष्ट होतो. कर्माच्या प्रक्रियेचे ज्ञान प्राप्त केल्याने कर्माला दूर करणे सोपे होते. निःस्वार्थ प्रेमाचा अनुभव आणि अभिव्यक्ती नकारात्मक कर्म ऊर्जेचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतो. निःस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी चार गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. एक, जाणून बुजून कोणालाही दुखवू नका. दोन, तुमचे प्रेम व्यक्त करण्याच्या मार्गात तुमच्या अभिमानाला आड येऊ देऊ नका. तीन, नकारात्मक विचार टाळा. चौथे, तुमच्या अपराध्यालाही क्षमा करा. क्षमापनेची ऊर्जा तुमच्या कर्माचा भार हलका करते.
- गणीवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज़
(फोटो आहे)