संस्कारपुष्प ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:02+5:302021-09-12T04:15:02+5:30
.................................. राग द्वेष, अहंकार यांनी हा संसार भरलेला आहे. आपल्यामधील अहंकार दूर करण्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. संपूर्ण वर्ष ...
..................................
राग द्वेष, अहंकार यांनी हा संसार भरलेला आहे. आपल्यामधील अहंकार दूर करण्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. संपूर्ण वर्ष आपण कित्येक अहंकार मनात ठेवून जगत असतो. कित्येकांशी कित्येक वाद होतात. जाणते- अजाणतेपणी कित्येकांना दुखावतो. जीवनात रोज धावपळ करत असताना आपण कित्येक हिंसा करतो. या सर्वांची माफी मागण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस होय. जेव्हा आपण एखाद्याचे मन दुखावतो तेव्हा त्यांना खूप दु:ख, त्रास होत असतो. या सर्व गोष्टीसाठी आपण त्यांची माफी आज मागत असतो. त्या बरोबरच दुसऱ्याला माफ देखील करायला हवे. मनुष्य छोट्या-छोट्या गोष्टीसाठी मान- सन्मान यावर अडून बसत असतो. पण आज आपण आपले पद, प्रतिष्ठा आणि अहंकार सर्व बाजूला ठेवून आज सर्वांची क्षमा मागायला हवी. धर्माचा हात पकडून आपल्याला ईश्वराच्या जवळ जायचे आहे.
- उपप्रवर्तक तारकऋषिजी महाराजमहाराज (फोटो आहे)