संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यात; 'हे' रस्ते राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 11:28 AM2023-06-12T11:28:37+5:302023-06-12T11:28:53+5:30
वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज शहरात आगमन होणार आहे. दोन्ही पालख्या शहरात आल्यावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून केले आहे.
संत तुकाराम महाराज पालखी बोपोडी चौकात पोहोचेपर्यंत हे रस्ते असतील बंद...
- बोपोडी चौक ते खडकी बाजार
- चर्च चौक
- पोल्ट्री फार्म चौक
- मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक
पालखी इंजिनिअरिंग कॉलेज चौकात पोहोचेपर्यंत..
- जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी असेल
- आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक
- सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक
इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते तुकाराम पादुका चौक..
दुपारी १२ वाजेपासून गरजेनुसार बंद करण्यात येणारे रस्ते..
- रेंजहिल चौक ते संचेती चौक
- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता)
- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे (शिवाजी रोड) रस्ता
- वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग
- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (मॉडर्न कॉलेज रोड)
- कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक
- मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक
संत तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौकादरम्यान बंद असलेले रस्ते..
- टिळक रोड ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता)
- शनिवार वाडा ते स. गो. बर्वे - संचेती चौक (शिवाजी रस्ता)
- कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक
- टिळक रोड - पूरम चौक ते अलका टॉकीज चौक
- लक्ष्मी रोड - बेलबाग चौक ते टिळक चौक
- शिवाजी रोड - जिजामाता चौक ते बुधवार चौक - बेलबाग चौक
- लक्ष्मी रोड - संत कबीर चौक - बेलबाग चौक
- शनिपार चौक ते सेवा सदन चौक
- नेहरू चौक - सोन्या मारूती चौक
बेलबाग चौक ते निवडुंगा विठोबा मंदिर / पालखी विठोबा मंदिर
- लक्ष्मी रोड - बेलबाग चौक ते सेवासदन चौक
- शिवाजी रोड - जिजामाता चौक ते बुधवार चौक - बेलबाग चौक
- लक्ष्मी रोड - संत कबीर चौक - बेलबाग चौक
- शनिपार चौक ते सेवा सदन चौक
- देवजीबाबा चौक चे हमजेखान चौक
- सोमवार पेठ पोलिस चौकी ते डुल्या मारुती चौक
- रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक