Ashadhi Wari 2022: आळंदीत "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष; माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 01:05 PM2022-06-21T13:05:14+5:302022-06-21T13:05:26+5:30

संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज

sant dnyaneshwar palkhi sohla start today | Ashadhi Wari 2022: आळंदीत "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष; माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान

Ashadhi Wari 2022: आळंदीत "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष; माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान

googlenewsNext

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, आज (दि.२१) तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे.

तत्पूर्वी, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. सुमारे पाच ते सहा लाखांहून अधिक भाविक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

दरम्यान आळंदीत हरिनामासह ''ज्ञानोबा तुकारामांचा'' अखंड जयघोष सुरू आहे. येथील इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेता पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रस्थाननंतर टाळ - मृदुंगाच्या निनादात मंदिर व शहर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर माऊलींची पालखीचा पहिला मुक्काम होईल.

Web Title: sant dnyaneshwar palkhi sohla start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.