Video: "संत तुकाराम महाराज कि जय", तुकोबांच्या पालखीचे पुण्यात आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:58 PM2022-06-22T17:58:26+5:302022-06-22T20:03:05+5:30

उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असणार

Sant Tukaram Maharaj palkhi enter in pune city | Video: "संत तुकाराम महाराज कि जय", तुकोबांच्या पालखीचे पुण्यात आगमन

Video: "संत तुकाराम महाराज कि जय", तुकोबांच्या पालखीचे पुण्यात आगमन

googlenewsNext

पुणे : कोरोना महामारीचे संकट ओसरताच अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे  सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले. ‘‘इंद्रायणीतीरी टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी,  तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती.’’ अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत आली. ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...अशी विठूरायाच्या भेटीची आर्तता वैष्णवांठायी दिसून आली होती. आज सायंकाळी 'संत तुकाराम महाराज की जय', या जयघोषात पुण्यात आगमन झाले. 

संचेती पुलाजवळ संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी ५.५२ वाजता आली. पुणे बार असोसिएशनच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. संत तुकारामांची पालखी नानापेठेतील निवडूंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामाला असते. बुधवारी सकाळपासूनच वारकरी पुण्यात दाखल होऊ लागले. पालख्यांबरोबर असलेल्या दिंड्यांचा मुक्काम दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पुण्यातील सर्वच रस्ते, गल्लीबोळ बुधवारी दिवसभर गजबजलेले होते. खांद्यावर पताका, हातात चिपळ्या व डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी, त्यांच्यासमवेत डोक्यावर तुळशीवृदांवन घेतलेल्या महिला यामुळे रस्ते रंगबेरंगी  दिसत होते. रस्त्याने जाताना वारकरी सामुहिक अभंग तसेच जयघोष करत होते.

पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झूंबड उडाली होती. कोरोनामुळे पालखीचा सोहळा तीन वर्षे झालाच नाही. त्यामुळे भक्तांना दर्शनाची आस लागली होती. अनेक पालकांनी बरोबर आणलेल्या लहान मुलांनाही पादुकांवर डोके टेकवायला लावून त्यांच्यात विठूदर्शनाची ओढ निर्माण केली. अनेक तुरूण मुलेमुलीही ग्रूप करून दर्शनासाठी आली होती. पालखी मार्ग ठिकठिकाणी रांगोळीने सजवण्यात आला होता. दिंडीतील वारकऱ्यांच्या विठूनामाच्या, ज्ञानेबातुकोबाच्या जयघोषाला भाविकांचीही साथ मिळत होती.

संत तुकाराम महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने  नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात  विसाव्यासाठी जाणार आहे. उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे. 

Web Title: Sant Tukaram Maharaj palkhi enter in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.