संत तुकाराम महाराज बीज सोहळा सुरू
By Admin | Published: March 9, 2017 04:22 AM2017-03-09T04:22:07+5:302017-03-09T04:22:07+5:30
श्री संत तुकाराममहाराज ३६९ व्या बीजोत्सव सोहळ्याला श्रीसंत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने सुरुवात झाली असून, सोहळ्याची सांगता १४ मार्चला तुकाराम बीजेच्या
देहूगाव : श्री संत तुकाराममहाराज ३६९ व्या बीजोत्सव सोहळ्याला श्रीसंत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने सुरुवात झाली असून, सोहळ्याची सांगता १४ मार्चला तुकाराम बीजेच्या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेत होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे यांनी दिली.
यानंतर १७ ते २१ मार्च दरम्यान रोज सकाळी १० ते १२ या वेळात कीर्तनाचे आयोजन केले आहे. या संपूर्ण सोहळ्याची सांगता २१ मार्चला महाप्रसादाने होणार आहे. संस्थानाच्या वतीने मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे. वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात कीर्तन मंडप उभारण्याचे काम सुरू असून, या परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना सांगण्यासाठी २० फुटांचा टॉवर उभारण्यात आला आहे. त्यावर ध्वनिक्षेपक लावण्यात येणार असून, पोलिसांकडून टेहळणीदेखील केली जाणार आहे.
- यात्रा काळात देहू-आळंदी रस्ता, तळेगाव- चाकण रस्ता, देहूफाटा ते येलवाडी देहूमार्ग व देहूगाव-देहूरोड रस्ता हा जड वाहनांसाठी बंद असणार आहे. - जड वाहतूक कॅनबे चौकातून म्हाळुंगे गावाकडे व तळवडे गावातून निगडीकडे वळविण्यात येईल. देहू-आळंदी रस्त्यावर तळवडे जकात नाक्याजवळ पार्किंग व्यवस्था केली जाणार असून, तेथून भाविकांना पायी सोडण्यात येईल.