पिंपरी दुमालात अवतरला सांताक्लॉज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:13+5:302020-12-26T04:09:13+5:30
कोरोना संकटामूळे गेल्या नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी व शिक्षकांचा थेट संपर्क थांबला आहे . ऑनलाईन शिक्षण चालू ...
कोरोना संकटामूळे गेल्या नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी व शिक्षकांचा थेट संपर्क थांबला आहे . ऑनलाईन शिक्षण चालू असले तरी मुलांमधील चैतन्य व आनंद कमी होत चालला आहे याची जाणीव राहुल चातुर गुरुजी यांना होत असे मुलांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करून त्यांनी आनंदाने अभ्यास चालू ठेवावा यासाठी हा उपक्रम त्यांनी राबविला.
राहुल चातुर यांनी सांताक्लॉजचा वेष परिधान करून सर्व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व लवकरच शाळा सुरू होईल असे सांगितले. सोबत आणलेल्या पोतडीमधून मुलांना केक व इतर खाऊंचे वाटप केले. गुरुजींना अचानक अशा अनोख्या रुपामध्ये पाहून मुले, पालक व ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले. शाळा बंद परंतू शिक्षण चालू येथील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असली तरी मुलांचे शिक्षण थांबले नाही. ऑनलाईन पध्दतीने पाठवलेल्या अभ्यासाची तपासणी व उजळणीसाठी गावामध्ये स्वाध्याय वर्ग नियमितपणे चालू आहे. स्थानिक स्वयंसेविका शोभा डोळस यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे चालू आहे. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले असून प्रत्यक्ष शाळा लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे.
--
फोटो : पिंपरी दुमाला येथील शाळेचे मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी सांताक्लॉजचा वेश परिधान करून विद्यार्थ्यांची भेट घेतली.