संतोष जगताप हत्याकांडातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात; दहा दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 03:25 PM2021-10-30T15:25:43+5:302021-10-30T15:35:20+5:30

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते

santosh jagtap murder mastermind caught by loni kalbhor police | संतोष जगताप हत्याकांडातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात; दहा दिवसांची पोलीस कोठडी

संतोष जगताप हत्याकांडातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात; दहा दिवसांची पोलीस कोठडी

Next

लोणी काळभोर: ऊरूळी कांचन ( ता. हवेली ) येथे झालेल्या संतोष जगताप हत्याकांडातील मुख्य सुत्रधारास पिर फाटा ( ता. शिरूर ) येथे लोणी काळभोर पोलीसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी उमेश सोपान सोनवणे ( वय , रा. राहु, ता. दौंड ) याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पवन गोरख मिसाळ ( वय २९ ) व महादेव बाळासाहेब आदलिंगे ( वय २६, दोघे रा. उरूळी कांचन ता. हवेली ) यांना अटक करण्यात आली असल्याने याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारांस उरूळी कांचन येथे हॉटेल सोनाईसमोर संतोष संपतराव जगताप ( रा. राहु ता. दौंड ) याचेवर तीन अनोळखी इसमांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात फायरींगमध्ये जगताप हे जागीच मयत झाले होते. त्यांचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी जगताप याचे अंगरक्षकाकडून केलेल्या फायरींगमध्ये मारेक-यामधील स्वागत बाप्पू खैरे ( वय २५, रा. दत्तवाडी, ऊरूळी कांचन, ता. हवेली ) हा जागीच ठार झाला होता.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते. परंतू सोनवणे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेणेसाठी वरीष्ठ पोलीस निरीक्ष राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तपास पथक सोनवणे याचा शोध घेत असताना तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना सोनवणे हा गुरुवार २८ ऑक्टोबर रोजी रात्री कानिफनाथ हॉटेल, पिर फाटा, ता. शिरूर येथे येणार असलेबाबत माहीती मिळाली.

त्यानुसार महानोर यांनी मोकाशी यांना कळवून त्यांचे आदेशाप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार  नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांचेसमवेत सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. काही वेळाने थांबले असताना बातमीप्रमाणे उमेश सोनवणे हा हॉटेल नजीक आलेचे निदर्शनास येताच तपास पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला गुन्हयात अटक करून आज  न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी त्याला १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ नम्रता पाटील, हडपसर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त  कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे  यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 

Web Title: santosh jagtap murder mastermind caught by loni kalbhor police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.