संतोष पठारे क्रिकेट क्लबने फटकावला ‘खराडी चषक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:26+5:302021-01-13T04:22:26+5:30
चंदननगर : महाराष्ट्रातील मानाचा खराडी चषक नुकताच पार पडला. अप्रतिम आयोजन असलेल्या या स्पर्धेत पुणे शहरातील विविध भागातील ...
चंदननगर : महाराष्ट्रातील मानाचा खराडी चषक नुकताच पार पडला. अप्रतिम आयोजन असलेल्या या स्पर्धेत पुणे शहरातील विविध भागातील संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक एक लाखांचे बक्षिस संतोष पठारे क्रिकेट क्लबने पटकविले, द्वितीय क्रमांक पन्नास हजारांचे बक्षिस गेम चेंजर संघाने पटकविले, तृतीय क्रमांक ऐकविस हजारांचे बक्षिस विश्रांतवाडी संघाने पटकविले, तर चतुर्थ क्रमांकचे पंधरा हजारांचे बक्षिस एईस या संघाने पटकविले.
स्पर्धेत संतोष पठारे स्पोर्टस क्लब, फायटर्स, परब, अजिंक्य किक्रेट क्लब, औंध क्रिकेट क्लब, पुणे कोर्पोरेट, पुना स्पोर्टस, यशवंत विश्रांतवाडी, गेम चेंजर्स, वैभव क्रिकेट क्लब, श्रीगणेश क्रिकेट क्लब, एसीसी क्रिकेट क्लब, एसपी क्लब, वारीयर्स क्लब यांस सारखे १६ संघ खराडी चषकामध्ये सहभागी झाले होते.
खराडी जिमखाना आणि आर्या स्पोर्टस यांच्या वतीनो टि-२० यांनी अतिशय सुंदर आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव, रियाझ बागवान, शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारप्राप्त आण्णासाहेब पठारे, माजी आमदार बापु पठारे, १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू यतीन मंगवाणी यांच्या हस्ते पार पडले होते.
खराडी चषकची अंतिम सामना गेम चेंजर्स संघाला हरवत संतोष पठारे स्पोर्ट क्लबने जिंकला. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज अनिकेत पोखाल आणि मालिकावीर किताब आनंद सहा याला प्लेंडर दुचाकी मिळाली. उत्कृष्ठ गोलंदाज सचिन भोसले तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेस म्हस्के यांनी मान मिळविला. बक्षीस वितरण छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते आण्णासाहे पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, नारायण गलांडे, विकास पठारे, संतोष पठारे, भैय्यासाहेब जाधव, सतिश पठारे, खराडी जिमखानाचे अध्यक्ष सतिश पठारे, संतोष पठारे यांच्या हस्ते केले. स्पर्धेचे आयोजन खराडी जिमखान व आर्या स्पोर्टस क्लब खराडी यांच्यावतीने करण्यात आले.
फोटो ओळ : खराडी चषक क्रिकेट स्पर्धेत विजेत संघ संतोष पठारे क्रिकेट क्लब मानचिन्ह देताना आण्णासाहेब पठारे, सुरेंद्र पठारे, महेंद्र पठारे, सतिष पठारे यांसह मान्यवर.