भोंदूगिरी करणार्या संतोष पिंजणचा पोलिस कस्टडीत आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: April 22, 2017 09:00 PM2017-04-22T21:00:43+5:302017-04-22T21:00:43+5:30
पोलीसाच्या कस्टडीत असलेला संतोष पिंजण यांने गुरुवारी मध्यरात्री पोलीस कस्टडीत असताना टाँवेलने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 22 - लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर तिरडीचा उतारा व मृत्युयंत्र ठेवल्याच्या आरोपाखाली पोलीसाच्या कस्टडीत असलेला संतोष पिंजण यांने गुरुवारी मध्यरात्री पोलीस कस्टडीत असताना टाँवेलने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र गार्डाच्या कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे ही दुघर्टना ठळली.
याप्रकारणी शुक्रवारी दि. 21 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात पिंजण याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कस्टडीतील चौकशीत भांगरवाडी येथिल मंगेश शेलार या व्यक्तीने मला वरील कृत्य करायला लावले असल्याचे पिंजण याने सांगितल्याने लोणावळ शहर पोलीसांनी शेलारला अटक केली असून आज त्याला वडगाव न्यायालयाने तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तर पिंजणला आज जामिन झाला.
दरम्यान पिंजण व शेलार यांच्यात मागील काही वर्षापासून वाद असून ते एकमेकाशी बोलत देखिल नाही. यामुळे जाणिवपुर्वक पिंजण याने शेलार याचे नाव या प्रकरणात गोवले असून खर्या मुख्य आरोपीला बगल देण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप याप्रकरणातील फिर्यादी नगराध्यक्षा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी करत पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एकंदरितच जादुटोणा व भोंदूगिरीच्या या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असून मुख्य आरोपी तसेच पिंजण याने नगरसेवक व फिर्यादी यांच्यासमोर दिलेल्या कबुली जबाबातील सफेद रंगाची गाडी व रिव्हाल्वरोल पोलीसांनी तात्काळ जप्त न केल्यास येत्या दोन दिवसात लोणावळा बंद करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.