सपकळवाडीने केली गावातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:23+5:302021-04-20T04:11:23+5:30

बारामती: बारामती आणि इंदापूरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्याच्या आणीबाणीची वेळ आली आहे. बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिविरसह सर्वच औषधांचा ...

Sapkalwadi did it in the village | सपकळवाडीने केली गावातच

सपकळवाडीने केली गावातच

googlenewsNext

बारामती: बारामती आणि इंदापूरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्याच्या आणीबाणीची वेळ आली आहे. बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिविरसह सर्वच औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना उपचारासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.त्यामुळे सपकळवाडी (ता.बारामती) ने गावातच १० बेडच्या कोविड उपचार केंद्राची निर्मिती केली आहे.

तालुक्यात सर्वत्र कोरोनाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे .आज लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत.त्यासाठी रुग्णाला घेऊन वणवण भटकण्याची वेळ आली आहे.त्यावर सपकळवाडी गावाने पर्याय शोधला आहे. गावा मध्ये जेथे सर्व काही संपते, तेथे गावातील तरूण कार्यकर्ते व ग्रामस्थ पदाधिकारी हे एकत्र होतात गावासाठी निर्णायक असे काम केले आहे.

सपकळवाडी गावाने पुन्हा आता वाढत असलेली कोरोना रूग्णांसाठी गावातच १० बेड निर्माण करून गावातच उपचार केले जातात. गावासाठी डॉ. राकेश मेहता यांनी गावातील कोविड रुग्णांसाठी उपचार सेवा देऊ केली आहे. डॉ.मेहता गावातील रुग्णांसाठी तपासण्यासाठी दिवसाआड भेट देतात. सध्या कोविड रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे.विविध औषधांसह,बेड देखील रुग्णांना मिळत नसल्याचे वास्तव आहे.या पार्श्वभुमीवर कोविडमुक्त होण्यासाठी सपकळवाडी पॅटर्न यशस्वी ठरल्यास इतर गावांनी देखील याचा आदर्श घेण्याची गरज आहे.तरच कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी फरपट थांबणार आहे. डॉ मेहता यांची साथ आणि सपकळवाडी ग्रामस्थांची साथ यामुळे ग्रामस्थ नक्कीच कोरोनावर यशस्वी मात करु,असे येथील युवकांनी सांगितले.

सपकळवाडी येथे कोविड रुग्णांची तपासणी करताना डॉ.राकेश मेहता.

१९०४२०२१-बारामती-१६

Web Title: Sapkalwadi did it in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.