एमपीडीए अंतर्गत सराईत गुन्हेगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:46+5:302021-03-18T04:12:46+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश थोरातवर २०१५ पासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव, घातक हत्यारे बाळगणे, ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश थोरातवर २०१५ पासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव, घातक हत्यारे बाळगणे, दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे, दरोडा तयारी, शिवीगाळ असे आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याला २०१७ मध्ये दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते. तडीपार करुनही त्याच्या गुन्हेगारी वृत्तीत फरक पडला नव्हता.
यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्या स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. पोलीस आयुक्तांनी १० मार्च रोजी स्थानबध्दतेचे आदेश काढताच थोरात पळून गेला होता. त्याला देहूरोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर, सहायक निरीक्षक मधुरा कोराणे, उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार गणेश शेंडे, राहुल तांबे, कृष्णा बढे, रवींद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, विक्रम सावंत, नीलेश खोमणे, हर्षल शिंदे, शिवा गायकवाड, नीलेश ढमढेरे, अमित शेंडगे, विक्रम खिलारी, सपकाळ, अनुसे यांच्या पथकाने केली.