पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:12 AM2021-02-27T04:12:28+5:302021-02-27T04:12:28+5:30
पुणे : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत ...
पुणे : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे असा २५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
शुभम रवींद्र पाटोळे (वय २२, रा. पर्वती पायथा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दत्तवाडी पोलिसांकडून गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी हद्दीत गस्त घातली जात आहे. तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना एक सराईत जनता वसाहत परिसरात पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले आणि कुंदन शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शुभम पाटोळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहेत. त्याने पिस्तूल कोठून आणले आहे. पिस्तुलाचा वापर तो कशासाठी करणार होता, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस निरीक्षक विजय खोमणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, अमित सुर्वे, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले, विष्णू सुतार, नवनाथ भोसले यांच्या पथकाने केली.