जीवे मारण्याची धमकी देऊन चेन लंपास करणा-या सराईताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:57+5:302021-04-10T04:09:57+5:30

पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गावर गावी जाण्यासाठी थांबलेल्या एकाला जीवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ...

Saraita arrested for threatening to kill Chain Lampas | जीवे मारण्याची धमकी देऊन चेन लंपास करणा-या सराईताला अटक

जीवे मारण्याची धमकी देऊन चेन लंपास करणा-या सराईताला अटक

googlenewsNext

पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गावर गावी जाण्यासाठी थांबलेल्या एकाला जीवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका सराईताला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सागर शिरवाळे (वय २२) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. ७ एप्रिल रोजी मुंबई-बंगळुरू महामार्गावर ही घटना घडली.

फिर्यादी हे वडगाव येथे मुंबई-बंगळुरू महामार्गावर गावी जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपयांची चेन जबरदस्तीने काढून घेतली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी शिरवाळे याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील चेन हस्तगत करायची आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? त्यांनी अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

---------------------------

Web Title: Saraita arrested for threatening to kill Chain Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.