घातक शस्त्र विक्रीसाठी आणल्या प्रकरणी सराईतास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:13+5:302021-07-11T04:10:13+5:30
-- चाकण : अवैध गावठी घातक शस्त्र जवळ बाळगून विनापरवाना विक्रीसाठी आणल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका सराईतास शनिवारी ...
--
चाकण : अवैध गावठी घातक शस्त्र जवळ बाळगून विनापरवाना विक्रीसाठी आणल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका सराईतास शनिवारी ( दि. १० जुलै ) जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह ७ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
प्रमोद किसन भसके ( वय - २५, रा. बलुतआळी, चाकण.) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर त्याचा साथीदार ईश्वर उर्फ अक्षय गोविंदा पाटील ( रा. नाणेकरवाडी, ता. खेड ) याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात अवैध गावठी शस्त्र बाळगुण विक्रीसाठी आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रमोद व अक्षय यांनी मिळून विक्रीसाठी आणलेल्या एकूण चार गावठी पिस्तुलसह ७ जीवंत काडतूसे विक्रीसाठी आणली होती. प्रमोद यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्या कडून दत्तात्रेय कडुसकर यास विक्री केलेल्या हत्यारासह ३ गावठी पिस्टल व एकूण सात जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. उर्वरित एक पिस्तूल व काडतुस अक्षय पाटील याच्याकडे होती.
प्रमोद व अक्षय यांच्याकडून तपासात एक गावठी बनावटीच्या पिस्तुलासह ७ जिवंत काडतुसे व मोबाईल फोन असा एकूण ३,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अक्षय पाटील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर चाकण, तळेगाव एमआयडीसी व खेड पोलीस स्टेशन येथे चोरी, मारामारी तसेच अवैध हत्यार बाळगणे आणि विक्रीसाठी आणणे अशा स्वरूपाचे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे श्रीमंत किप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल देवडे, उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, विजय जगदाळे, सुरेश हिंगे, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, मनोज साबळे, मच्छिंद्र भांबुरे, अनिल गोरड, नितीन गुंजाळ, निखिल वर्पे, अशोक दिवटे, विलास कांदे आदींनी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहे
--
असा लागला सुगावा
अधिक वृत्त असे की. बुधवारी ( दि. ७ ) रात्री चाकण पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन गुन्ह्यातील ईश्वर पाटील हा नाणेकरवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील पथकाला सूचना व मार्गदर्शन केले. त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन करून अक्षय पाटील याचा राहत्या घरी शोध घेतला असता तो घरात बेड मध्ये लपून बसलेला मिळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पोलिसांवर हल्ला करत झटापट करून धक्काबुक्की करत पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस आपले शासकीय काम करत असताना त्यात अडथळा निर्माण केला.
त.
-------------------------------------------------
फोटो क्रमांक : १०चाकण गावठी पिस्तुल ताब्यात
फोटो - चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलेली अवैध व घातक शस्त्रे,.
------------------