सर्जा-राजाचे आळंदीत भव्य स्वागत
By admin | Published: June 17, 2016 05:04 AM2016-06-17T05:04:38+5:302016-06-17T05:04:38+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक हभप हैबतबाबा यांनी सुरू केलेल्या वैभवी पालखी सोहळ्याचे पायी वारीतील श्रींच्या वैभवी रथास यंदा जुंपण्याचा मान मिळालेल्या सर्जा-राजा या
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक हभप हैबतबाबा यांनी सुरू केलेल्या वैभवी पालखी सोहळ्याचे पायी वारीतील श्रींच्या वैभवी रथास यंदा जुंपण्याचा मान मिळालेल्या सर्जा-राजा या बैलजोडीच गुरुवारी आळंदीत ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, भंडाऱ्याची मुक्तउधळण करीत व हरिनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.
हा मान येथील संतोष दगडू वहिले पाटील यांना मिळाला आहे. वहिले यांनी रथवैभवात वाढ करेल अशी सर्जा-राजा या बैलजोडीची निवड करून सुमारे १ लाख ५१ हजार रुपये देऊन रांजणगाव येथील प्रगतिशील शेतकरी पाचुंदकर यांच्याकडून बैल खरेदी केले. या बैलजोडीची आळंदीतील चाकण चौकातून नगरप्रदक्षिणा मार्गे, चावडी चौक, नगर परिषद चौकमार्गे महाद्वार अशी भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
बैलजोडी मंदिरासमोर दाखल होताच सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार यांनी त्याचे स्वागत केले. आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी बैलजोडीची पूजा केली. सुवासिनींनी बैलजोडीच औक्षण करत पूजा केली. देवस्थानतर्फे बैलजोडीच्या सेवेचे मानकरी संतोष वहिले यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. आळंदीतील नागरिक, भाविक यांनी बैलजोडी पाहण्यास मिरवणुकीदरम्यान प्रदक्षिणा मार्गावर आणि माऊली मंदिर प्रांगणात मोठी गर्दी केली होती.
या वेळी महाद्वारात श्रींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, आमदार सुरेश गोरे, आळंदीचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, सभापती डी.डी. भोसले, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, विश्वस्त अभय टिळक, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, आळंदी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय कुऱ्हाडे, बबनराव
कुऱ्हाडे, बैलजोडीचे मालक संतोष वहिले, रमेश गोगावले, राजेंद्र घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, उमेश रानवडे, पृथ्वीराज बावीकर, विलास कुऱ्हाडे, शरद मुर्डे, ज्ञानेश्वर कोद्रे,
आळंदी पालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, बैल निवड समितीचे सदस्य, संस्थान कर्मचारी-पदाधिकारी, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)