डेंगी प्रतिबंधासाठी सरसावली पालिका

By admin | Published: July 8, 2016 04:15 AM2016-07-08T04:15:33+5:302016-07-08T04:15:33+5:30

मागील काही दिवसांपासून शहरातील डेंगी या आजाराला कारणीभूत असणाऱ्या एडीस इजिप्ती या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र शहरात आहे. हा डास चावल्याने होणाऱ्या डेंगीच्या रुग्णांतही वाढ होत आहे

The Saraswal Palika for Dengue restrictions | डेंगी प्रतिबंधासाठी सरसावली पालिका

डेंगी प्रतिबंधासाठी सरसावली पालिका

Next

पुणे : मागील काही दिवसांपासून शहरातील डेंगी या आजाराला कारणीभूत असणाऱ्या एडीस इजिप्ती या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र शहरात आहे. हा डास चावल्याने होणाऱ्या डेंगीच्या रुग्णांतही वाढ होत आहे. त्यामुळे या वर्षाची पुण्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या जुलैमध्येच ३४८ वर गेली आहे.
ही आकडेवारी लक्षात घेऊन या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने धडक मोहीम सुरू केली आहे. शहरामध्ये जानेवारीपासून मेपर्यंत केवळ ३० डेंगीचे रुग्ण आढळले होते. मात्र, गेल्या महिनाभरामध्ये जवळपास शंभर रुग्ण आढळल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार पावसाचे पाणी, सोसायट्यांमधील छोट्या बागा, गच्चीवर ठेवलेल्या वस्तू आणि कुंड्यांमध्ये साचत आहे. फ्रिजच्या मागील ट्रेमधील आणि फुलदाणीमधील पाण्यात डेंगीच्या डासांची अंडी सापडली आहेत. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी डासांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी तेथील पाणीसाठा तपासणीची जोरदार मोहीम राबविण्यात आली.

डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे औषध फवारणी सुरू केली आहे. डेंगीचा किंवा संशयित रुग्ण सापडलेल्या घरात आणि त्याच्या शेजारील चारशे घरांमध्ये धूरफवारणी करण्यात येत आहे. - डॉ. एस. टी. परदेशी, पालिकेचे आरोग्य प्रमुख

Web Title: The Saraswal Palika for Dengue restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.