फुरसुंगीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक कोटी पंचवीस लाखांच्या जळाल्या साड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:31 PM2019-03-11T18:31:10+5:302019-03-11T18:32:50+5:30
एका कपडयाच्या दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये दुकानातील १ कोटी २५ लाखांचा रूपयांच्या साडया व अन्य कपडे फर्निचर जळून खाक झाले.
फुरसुंगी : एका कपडयाच्या दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये दुकानातील १ कोटी २५ लाखांचा रूपयांच्या साडया व अन्य कपडे फर्निचर जळून खाक झाले. फुरसुंगी-पुणे- सासवड रोडवरील गणेशनगर येथे कुंकु कन्या दुकान व बालाजी टेक्साइल दुकानाला रविवारी (दि.१०)रात्री सव्वा वाजताच्या दरम्यान आग लागली होती . याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलास माहिती दिली.
दरम्यान अग्निशामक दलाच्या कोंढवा, हडपसर व मध्यवर्ती केंद्रतील ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कपडयाचे दुकान असल्याने आग झपाटयाने पसरली,दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी २० ते २५ मिनिटात आग आटोक्यात आणली.जागेचे मालक सुनिल हरपळे व त्यांनी भाडेकरूला दिलेले दुकान मालक पंकज टिळकराज अग्रवाल यांच्या दुकानाला आग लागली दुकानामध्ये प्लायवुड फर्निचर, साड्या, फॅन असे वायर ग्लास काचा इ. साहित्य जळाले. फायरमन दत्तात्रय चौधरी , मारुती शेलार, संपत चौरे बाबा चव्हाण यांनी आग पूर्णपणे विझविली. फुरसुंगी,येथील एका कपडयाच्या दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये दुकानातील १ कोटी २५ लाखांच्या साडया व अन्य कपडे फर्निचर जळून खाक झाले.