दिल्लीत साहित्य संंमेलन आयोजित करण्यात 'सरहद'ला रस नाही :संजय नहारांची स्पष्ट भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:09 PM2021-08-10T22:09:56+5:302021-08-10T22:10:57+5:30

दिल्लीत ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहद संस्थेला रस नाही आणि भविष्यात कधीच त्यासाठी पुढाकार घेतला जाणार नाही.

'Sarhad' not interested in organizing Sahitya Sammelan in Delhi: Sanjay Nahar's clear role | दिल्लीत साहित्य संंमेलन आयोजित करण्यात 'सरहद'ला रस नाही :संजय नहारांची स्पष्ट भूमिका 

दिल्लीत साहित्य संंमेलन आयोजित करण्यात 'सरहद'ला रस नाही :संजय नहारांची स्पष्ट भूमिका 

Next

पुणे : दिल्लीत ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहद संस्थेला रस नाही आणि भविष्यात कधीच त्यासाठी पुढाकार घेतला जाणार नाही अशी भूमिका सरहद संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक येथे नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचा पत्ता नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची 95 व्या साहित्य संंमेलानाच्या आयोजनासाठी चाचपणी सुरू झाली आहे. नुकत्याच महामंडळाच्या झालेल्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनावर चर्चा देखील करण्यात आली आहे. भविष्यात सरहदद संस्था संमेलन घेण्यास पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न अखिल भारतीय महामंडळाशी संबंधित व्यक्तींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी बांधवांकडून सरहदद संस्थेला विचारला जात आहे.त्या पार्श्वभूमीवर सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी स्पष्टपणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांना पत्राद्वारे आपली भूमिका कळविली आहे.

सरहद संस्थेचा दिल्लीसाठीचा प्रस्ताव केवळ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2021 रोजी साठीचा होता. तो प्रस्ताव कोव्हिड अथवा वेगवेगळ्या कारणांनी नाशिक संमेलन पुढे गेल्याने भविष्यात संस्था पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र त्याचवेळी संस्था भविष्यात कधीही  साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेणार नसल्याचे लेखी कळवले होते.

नाशिकला संमेलनासाठी शुभेच्छा देताना भविष्यात योग्यवेळी दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले पाहिजे हीच सरहदची भूमिका होती, आहे आणि भविष्यातही राहील. मात्र कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तीगत अहंकार असणा-या प्रवृत्ती महामंडळात असपेर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे असे वाटते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची 95 व्या साहित्य संंमेलानाच्या आयोजनासाठी चाचपणी सुरू झाली आहे. नुकत्याच महामंडळाच्या झालेल्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनावर चर्चा देखील करण्यात आली आहे. भविष्यात सरहद संस्था संमेलन घेण्यास पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न अखिल भारतीय महामंडळाशी संबंधित व्यक्तींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी बांधवांकडून सरहद संस्थेला विचारला जात आहे.त्या पाशर््वभूमीवर सरहदद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी स्पष्टपणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांना पत्राद्वारे आपली भूमिका कळविली आहे.

सरहद संस्थेचा दिल्लीसाठीचा प्रस्ताव केवळ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2021 रोजी साठीचा होता. तो प्रस्ताव कोव्हिड अथवा वेगवेगळ्या कारणांनी नाशिक संमेलन पुढे गेल्याने भविष्यात संस्था पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.मात्र त्याचवेळी संस्था भविष्यात कधीही  साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेणार नसल्याचे लेखी कळवले होते.

नाशिकला संमेलनासाठी शुभेच्छा देताना भविष्यात योग्यवेळी दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले पाहिजे हीच सरहदची भूमिका होती, आहे आणि भविष्यातही राहील. मात्र कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तीगत अहंकार असणा-या प्रवृत्ती महामंडळात असपेर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे असे वाटते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

Web Title: 'Sarhad' not interested in organizing Sahitya Sammelan in Delhi: Sanjay Nahar's clear role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.