राजगुरू महाविद्यालयातील सारिका शिनगारे, वैष्णव ठाकूर यांना राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:17+5:302021-08-20T04:14:17+5:30
या यशामुळे सारिका शिनगारे, वैष्णव ठाकूर यांची २५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान पतियाळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिराकरिता निवड ...
या यशामुळे सारिका शिनगारे, वैष्णव ठाकूर यांची २५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान पतियाळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिराकरिता निवड झाली आहे. या शिबिरातून ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या वरिष्ठ व कनिष्ठ गटाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेकरिता भारतीय वेटलिफ्टिंग संघाची निवड होणार आहे.
संस्थाध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील यांनी सारिका शिनगारे व वैष्णव ठाकूर या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. यशापयशाची चिंता न करता सर्वोत्तम क्षमतेने खेळ करण्याचे आवाहन केले. संस्थेच्या वतीने क्रीडा संस्कृती जोपासताना विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा. तानाजी पिंगळे, प्रा. सारिका गोरे, प्रा. योगेश मोहिते यांनी मार्गदर्शन केले, तर राहुल गायकवाड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा लोणारी यांनी केले, तर आभार प्रा. तानाजी पिंगळे यांनी मानले.