कोरोना नियमावलीबाबत डोर्लेवाडीचे सरपंच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:57+5:302021-03-30T04:07:57+5:30

वाढत्या कोरोना साथीमुळे माजी सभापती अशोक नवले व छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश मोरे यांनी बारामती शहर पोलीस ...

Sarpanch of Dorlewadi indifferent about Corona rules | कोरोना नियमावलीबाबत डोर्लेवाडीचे सरपंच उदासीन

कोरोना नियमावलीबाबत डोर्लेवाडीचे सरपंच उदासीन

Next

वाढत्या कोरोना साथीमुळे माजी सभापती अशोक नवले व छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश मोरे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याशी संपर्क साधून डोर्लेवाडीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करावी, अशी मागणी केली होती. सदर मागणीवरून पोलीस प्रशासन डोर्लेवाडी या ठिकाणी आले. परंतु सरपंच पांडुरंग सलवदे यांनी या पोलीस प्रशासनास तुम्ही ग्रामस्थांवर अशा प्रकारे कारवाई आपण करू नका, तूर्तास आपल्या कारवाईची डोर्लेवाडीमध्ये काही गरज नाही असे सांगून पोलिस प्रशासनास आले पाऊले परत धाडले. डोर्लेवाडी येथे या घडलेल्या प्रकरणाबद्दल ग्रामस्थांनी विचारणा केली असता गावचे सरपंच पांडुरंग सलवदे यांनी ग्रामस्थांनाच अरेरावीची भाषा वापरून धमकीच दिली. जर कोरोनाचा वाढता आलेख असाच राहिला तर यास सर्वांस आपण जबाबदार राहाल, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Sarpanch of Dorlewadi indifferent about Corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.