गोळीबार प्रकरणी अटक असणाऱ्या सरपंच जयदीप तावरे यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:56+5:302021-07-29T04:10:56+5:30
जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर ( दि. ३१ मे) रोजी वडापाव घेताना संभाजीनगर माळेगाव ...
जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर ( दि. ३१ मे) रोजी वडापाव घेताना संभाजीनगर माळेगाव येथे गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांकडून अवघ्या पाच तासात गोळीबार करणारे आरोपीना अटक करण्यात आली. याप्रकरणी प्रशांत मोरे, विनोद मोरे, रिबेल यादव व एका अल्पवयीन मुलावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. दरम्यान फिर्यादिने गोळीबारातून बरे झाल्यानंतर जबाब देऊन चिथावणी दिली म्हणून माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांच्यावर कलम नं. १०९ अंतर्गत कारवाई करत (दि. ६ जुलै) रोजी अटक केली. सदर प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांना अटक झाल्यानंतर ८ जुलै रोजी माळेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी महिला, ग्रामस्थ व युवकांनी लावलेली उपस्थिती लक्षवेधी होती. अनेक वक्त्यांनी या अटकेबाबत नाराजी व्यक्त केली. रविराज तावरे यांच्यावर या सभेत जोरदार टीका करण्यात आली होती.तसेच जयदीप तावरे यांच्यावरील गुन्हे माघारी घेण्याचे आवाहन केले. या निषेध मोर्चाची जिल्ह्यात चर्चा झाली. तब्बल तेविस दिवसानंतर पुणे येथील मोक्का न्यायालयात न्या.अग्रवाल यांनी सदर प्रकरणात जयदीप तावरे यांना जामीन मंजूर करण्यात आला.
———————————————————