बारामती तालुक्यातील सोनगावमध्ये सरपंचांच्या पतीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 06:09 PM2020-01-15T18:09:52+5:302020-01-15T18:18:35+5:30
महिलांच्या छेडछाडीवरुन ही घटना झाल्याची चर्चा...
बारामती : सोनगाव (ता.बारामती) येथील विद्यमान सरपंच जयश्री युवराज थोरात यांच्यापतीची ऐन संक्रांतीदिवशी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली.युवराज थोरात (वय ५०) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. महिलांच्या छेडछाडीवरुन ही घटना झाल्याची चर्चा आहे. संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खूनप्रकरणी आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.बुधवारी(दि १५) दुपारी दुपारी सोनेश्वर मंदिर परिसरात एका युवकाने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.याबाबत समजलेली माहिती अशी की, आज मकर संक्रांतीचा कार्यक्रम असल्याने सोनेश्वर मंदिरात महिला त्याठिकाणी पूजा करण्यासाठी येत होत्या. आरोपी महिलांना त्रास देत होता. युवराज थोरात यांनी या आरोपीला हटकल्यावर आरोपीने थोरात यांचा धारदार शस्त्राने वार करुन खुन केला.