सिम्बॉयसिस लॉ स्कूलच्या सार्थक मिश्राला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:09 AM2021-03-20T04:09:38+5:302021-03-20T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझमध्ये क्लस्टर अकराच्या अंतिम फेरीत पुण्यातील सिम्बॉयसिस लॉ स्कूलच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझमध्ये क्लस्टर अकराच्या अंतिम फेरीत पुण्यातील सिम्बॉयसिस लॉ स्कूलच्या सार्थक मिश्राने विजेतेपद जिंकले आहे. महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात येणारी भारतातील सर्वात मोठी बिझनेस क्विझ यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन आयोजित करण्यात आली.
टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझच्या क्लस्टर अकरात पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर आणि उस्मानाबाद यांचा समावेश आहे. विजेत्याला ३५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्याला राष्ट्रीय अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी झोनल अंतिम फेरीत देखील सहभागी होता येणार आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेचा विद्यार्थी प्रजोत पाटणे याने उपविजेतेपद पटकावले असून त्याला १८ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. पुण्याच्या टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरचे संचालक इमॅन्युएल डेव्हिड या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रत्येक क्लस्टर अंतिम फेरीतील विजेता/विजेती झोनल अंतिम फेरीमध्ये सहभागी होईल. चार झोनल अंतिम फेरीतील विजेते थेट अंतिम फेरीसाठी पात्र मानले जातील. चार झोनल अंतिम फेरीतील उपविजेते वाईल्ड कार्ड फायनलमध्ये उतरतील आणि ४ उपविजेत्यांपैकी २ राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. एकूण ६ स्पर्धक राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होतील. त्यांच्यामध्ये सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या स्पर्धकाला राष्ट्रीय विजेता घोषित केले जाणार असून अडीच लाख रुपयांचे रोख पारितषिक दिले जाणार आहे.