त्रुतीय पंथीयांच्या आरोग्याकडे ससूनचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:25+5:302021-01-16T04:15:25+5:30
पुणे: सावर्जनिक रुग्णालयांमध्ये तृतीय पंथीय नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष व सर्व प्रकारच्या सुविधा असाव्यात असा कायदा संसदेने केले आहे. त्याकडे ...
पुणे: सावर्जनिक रुग्णालयांमध्ये तृतीय पंथीय नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष व सर्व प्रकारच्या सुविधा असाव्यात असा कायदा संसदेने केले आहे. त्याकडे ससूनचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार खासदार वंदना चव्हाण यांनी थेट ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली.
तृतीय पंथीयांच्या प्रतिनिधी शोनाली दळवी, प्रेरणा वाघेला, मयूरी बनसोड यांच्यासमवेत खासदार चव्हाण यांनी शुक्रवारी ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची भेट घेतली.
तृतीयपंथीयाकडे त्यांच्या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. त्यामुळेच संसदेने त्यासाठी विशेष कायदा मंजूर केला, मात्र त्याची अंमलजावणी ससूनमध्ये झाली नसल्याबद्दल खासदार चव्हाण यांनी तांबे यांच्याकडे खेद व्यक्त केला व कायद्यात आहे त्याप्रमाणे सुविधा निर्माण करण्याची मागणी केली.
बाह्य रुग्ण विभागात त्यांच्यासाठी राखीव वेळ मिळणे, वेगळी स्वच्छतागृह करणे, एचआयव्ही ग्रस्त तृतीयपंथांसाठी वेगळा कक्ष निर्माण करणे, सरकारच्या आरोग्यविषयक योजनांची त्यांनी विस्ताराने माहिती देणे ही कामे प्रामुख्याने करावीत अशी सुचना चव्हाण यांनी केली. डॉ. तांबे यांनी यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांना दिले.