Breaking: ससूनचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी, उच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:58 PM2023-11-10T12:58:45+5:302023-11-10T13:10:54+5:30

पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश

Sassoon's Vice-Chancellor Dr. Sanjeev Thakur removed from the post of Vice-Chancellor, High Court verdict | Breaking: ससूनचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी, उच्च न्यायालयाचा निकाल

Breaking: ससूनचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी, उच्च न्यायालयाचा निकाल

पुणे : डॉ. संजीव ठाकूर यांची बी.जे. अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे.  उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आराेग्य संस्थेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर डाॅ. संजीव ठाकूर यांची वर्णी ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. ते साेलापूरच्या डाॅ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी कार्यरत होते. डाॅ. काळे हे जे.जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदाेन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रूजू झाले हाेते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची बदली करण्यात आली, तर डाॅ. ठाकूर यापूर्वी ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत हाेते. त्या विरोधात काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Sassoon's Vice-Chancellor Dr. Sanjeev Thakur removed from the post of Vice-Chancellor, High Court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.