सासवड नगरपालिकेचे करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:13 AM2021-02-27T04:13:25+5:302021-02-27T04:13:25+5:30

अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक ९१ लाख ८५ हजार रुपये इतकी दर्शविली असून २०२१-२२ मध्ये अंदाजे महसुली जमा १९ कोटी ८३ ...

Saswad Municipality's non-taxable balance estimate | सासवड नगरपालिकेचे करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्र

सासवड नगरपालिकेचे करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्र

Next

अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक ९१ लाख ८५ हजार रुपये इतकी दर्शविली असून २०२१-२२ मध्ये अंदाजे महसुली जमा १९ कोटी ८३ लाख ८२ हजार व भांडवली जमा १३५ कोटी ८० लाख रुपये असे एकूण १५६ कोटी ५५ लाख ६७ हजार इतकी अपेक्षित धरली आहे. महसुली खर्च २३ कोटी १४ लाख ७३ हजार तर भांवडली खर्च १३५ कोटी १५ लाख असे एकूण १५६ कोटी २९ लाख ७३ हजार खर्च अपेक्षित आहे.

या अंदाजपत्रकात नागरिकांना कोणतीही करवाढ केली नाही.

शासनाकडून येणा-या अनुदानातून विविध विकासकामे करण्यात येणार असून या अर्थसंकल्पात भौतिक सुविधांवर विशेष भर देण्यात आल्याचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी सांगितले. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्ष निर्मला जगताप व सर्व नगरसेवक आणि खातेप्रमुख या सभेला उपस्थित होते.

या अंदाजपत्रकात शहराच्या विविध विकास कामांकरिता शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हा व राज्य स्तर, नागरी दलित व दलितेत्तर वस्ती सुधार योजना, तीर्थक्षेत्र विकास, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, १५ वा वित्त आयोग, नावीन्यपूर्ण योजना, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांतून १३५ कोटी २० लाखांचा निधी मिळणे अपेक्षित धरला आहे.

याप्रसंगी नगरसेवक विजय वढणे, सुहास लांडगे, संदीप जगताप, संजय जगताप, मनोहर जगताप, प्रवीण भोंडे, सचिन भोंगळे, दीपक टकले, बाळासाहेब पायगुडे, संजय चौरे, नगरसेविका पुष्पा जगताप, वसुधा आनंदे, सारिका हिवरकर, माया जगताप, मंगल म्हेत्रे, सीमा भोंगळे, डॉ. अस्मिता रणपिसे यांसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. लेखापाल राजेश नलावडे यांनी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाचे वाचन केले.

सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला, मुख्याधिकारी जळक यांनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष भोंडे यांनी आभार मानले.

Web Title: Saswad Municipality's non-taxable balance estimate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.