भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे सासवडकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:06+5:302021-09-13T04:10:06+5:30
सासवड : सासवडकर सध्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. सासवड शहरातील एसटी बसस्थानक, रस्ते, चौक, मोकळी मैदाने, पालखीतळ ...
सासवड : सासवडकर सध्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. सासवड शहरातील एसटी बसस्थानक, रस्ते, चौक, मोकळी मैदाने, पालखीतळ भाजी मंडई, सोपाननगर आदी भागात कुत्र्यांचा वावर वाढलाय. याचा सासवडकरांना प्रचंड त्रास होतोय. भटक्या कुत्र्यांची संख्याही सासवडमध्ये झपाट्याने वाढत असल्याो समोर आलेय. शहरातील दत्तनगर, तारादत्त पूर्व, पश्चिम, त्रिशूल सोसायटी, बाजारपेठ आणि वाघ डोंगर, भाजीबाजार परिसरात कुत्रे मोठ्या प्रमाणात आहेत.
सासवडमधील नागरिकांना कुत्र्यांचा एवढा त्रास व्हायला लागलाय की गाडी चालवत असताना गाडीच्या मागे धावतात, त्यामुळे अनेक अपघात होताहेत.
सासवड नगरपालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. अनेक नागरिक कुत्र्यांची लहान पिल्ले पाळण्यासाठी नेत असल्याने कुत्रे पिल्लांच्या विरहाने आक्रमक होत अनेकांना चावा घेताहेत. दिवसा व रात्री गाडी चालवत असताना कुत्रे भुंकत अचानक आडवे येत असल्यामुळे अपघात होत आहेत.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सासवडकरांनी केली आहे खरी आता नागरिकांची ही समस्या नगर परिषद प्रशासन कशा पद्धतीने सोडवते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
———————————————————————————————————
120921\1725-img-20210912-wa0002.jpg
भटके कुत्र्यांच्या उपद्रवामुळे सासवडकर हैराण