सासवडला कोविड लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:40+5:302021-03-26T04:12:40+5:30

-- सासवड : पुरंदर तालुक्याचे मुख्यालय सासवड असतानाही येथे कोविड लसीकरण केंद्र नव्हते. परंतु, आज हे लसीकरण केंद्र ...

Saswadla Kovid Vaccination Center started | सासवडला कोविड लसीकरण केंद्र सुरू

सासवडला कोविड लसीकरण केंद्र सुरू

Next

--

सासवड : पुरंदर तालुक्याचे मुख्यालय सासवड असतानाही येथे कोविड लसीकरण केंद्र नव्हते. परंतु, आज हे लसीकरण केंद्र सुरू झाले. सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ झाला. दररोज येथे किमान ४०० ते ५०० जणांना लसीचे डोस दिले जातील. त्याशिवाय एप्रिलच्या प्रारंभीच दिवे व गराडे येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पुरंदर तालुक्यात याअगोदर बेलसर, नीरा, वाल्हे, जेजुरी, माळशिरस, परींचे या सहा ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. सातवे केंद्र सासवडला आज सुरू झाले. तर एक एप्रिलपासून दिवे, गराडे येथे केंद्र सुरू झाल्यास एकुण नऊ केंद्रांद्वारे रोज किमान चार हजार ते साडेचार हजार गरजूंना लसीकरण होऊ शकते, असे डाॅ. सुमित काकडे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार रुपाली सरनोबत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उत्तमकुमार तपासे, डाॅ. किरण राऊत, डाॅ. विवेक आबनावे, सासवडच्या उपनगराध्यक्षा वसुधा आनंदे, नगरसेविका माया जगताप, सुनीता कोलते, यशवंत जगताप, अजित जगताप, संजय ग. जगताप, विजय वढणे, बाळासाहेब पायगुडे, सागर जगताप, संभाजी जगताप, विजय कदम, सुनील जगताप आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष भोंडे म्हणाले की, तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून हे लसीकरण केंद्र सासवडला सुरू होत आहे. त्याचा लाभ सासवडसह परिसरातील गरजूंनी घ्यावा. यानिमित्ताने डाॅ. राऊत म्हणाले की, सासवड ग्रामीण रुग्णालयात आपण पूर्वीच ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय सुरू केले होते. त्यामुळे कोणाला काही त्रास झाल्यास आरोग्य संस्थेतच लसीकरण करण्याची शासनाची अट होती. त्यामुळेच सासवडला लसीकरण केंद्र येथे सुरू करता येत नव्हते. बाकी लसीकरण केंद्रात आतापर्यंत झालेल्या लसींच्या वितरणाचे दुष्परीणाम दिसून न आल्याने आता दुसऱ्या टप्प्यात सासवडला हे केंद्र सुरू केले.

--

चौकट

ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय केल्याने शेजारी तालुका पंचायत समितीच्या जुन्या इमारत परिसरात विश्रामगृहात बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे. तिथे हे लसीकरण केंद्र सुरू केले. सुट्टीचा दिवस वगळून रोज सकाळी १० ते ४ या वेळेत लसीकरण होईल. पहिल्या टप्प्यात ६० वर्षांच्या पुढील व काही आजार असणाऱ्यांना व एक एप्रिलपासून वयाच्या ४५ वर्षापुढील व्यक्तींना नोंद केल्यावर लस दिली जाईल. असे डाॅ. राऊत यांनी अधिक माहितीत स्पष्ट केले.

-------------------

फोटो क्रमांक : २५सासवड लसीकरण केंद्र

सासवड (ता.पुरंदर) : सासवड येथील कोविड लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अधिकारी व पदाधिकारी.

Web Title: Saswadla Kovid Vaccination Center started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.