सासवडची गॅस शवदाहिनी महिन्यात होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:51+5:302021-05-11T04:10:51+5:30

सासवड : सासवडची वाढती लोकसंख्या व कोरोनातील वाढते मृत्यूचे प्रमाण यामुळे सासवड स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनी बांधण्याचे काम प्रगतिपथावर असून, ...

Saswad's gas cremation will start in the month | सासवडची गॅस शवदाहिनी महिन्यात होणार सुरू

सासवडची गॅस शवदाहिनी महिन्यात होणार सुरू

Next

सासवड : सासवडची वाढती लोकसंख्या व कोरोनातील वाढते मृत्यूचे प्रमाण यामुळे सासवड स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनी बांधण्याचे काम प्रगतिपथावर असून, पुढच्या महिन्यातच गॅसदाहिनी सुरू होईल अशी माहिती सासवडचे नगरााध्यक्ष मार्तंड भोडे यांनी दिली.

मृतदेहांच्या दहनविधीसाठी लाकडांचा वापर केला जातो, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. शिवाय, कोरोनाच्या काळात मृतांची संख्या वाढत असल्याने दहनविधीसाठीही नंबर लावावे लागतात ही गैरसोय टाळण्यासाठी सासवड नगरिपालिकेच्या वतीने गॅसदाहिनीची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी ६० लाख ६९ हजार २८२ रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे काम सुरू केले होते. त्याचे काम सुरू झाले आहे. साधारण एक महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी दिली.

सासवड नगरपालिकेच्या बजेटमध्ये याची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर तीन महिने पूर्वी येथे काम सुरू करण्यात आले. पण लॉकडाऊनच्या काळात मजूर उपलब्ध नसल्यामुळे कामात दिरंगाई झाली, पण आता गॅसदाहिनीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून साधारण एक महिन्यात पूर्ण होईल.

आमदार संजय जगताप व नगरपालिकेच्या गटनेत्या आनंदी जगताप यांच्या पाठपुराव्याने या गॅस शवदाहिनीसाठी निधी मंजूर झाला.

या वेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती यशवंत जगताप, नगरसेवक दीपक टकले, सूरज जगताप, बांधकाम विभागाचे अधिकारी राम भनगुरे, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण ठेकेदार सुनीलनाना जगताप आदी उपस्थित होते.

--

१०सासडव गॅसदाहिनी

फोटो :)ृः सासवड ( ता. पुरंदर ) येथील स्मशानभूमीत नव्याने होत असलेली गॅस शवदाहिनीचे काम.

Web Title: Saswad's gas cremation will start in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.