ऋतुजा शेजवळच्या उपग्रहाची रामेश्वर येथून आकाशात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:04+5:302021-03-07T04:11:04+5:30
विद्यार्थ्यांनी बनवलेले हे शंभर उपग्रह बलूनद्वारे सोडल्याने विश्वविक्रमात नोंद झाली आहे. तसेच, या उपग्रहाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड ,भारतीय बुक ...
विद्यार्थ्यांनी बनवलेले हे शंभर उपग्रह बलूनद्वारे सोडल्याने विश्वविक्रमात नोंद झाली आहे. तसेच, या उपग्रहाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड ,भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमांतर्गत जगातील सर्वांत कमी वजनाचे 25 ते 80 ग्रॅम वजन असणारे 100 उपग्रह बनवून त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर बलूनद्वारे प्रक्षेपित करण्याचा विश्वविक्रम राबविण्यात आला. यावेळी या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी कलम कुटुंबीय, तेलंगणाचे राज्यपाल तमीळ साई, सौंदरा राजन, ब्रह्मोस मिसाईल फाउंडर डॉ. ए. पिलाई, डॉ. लिमा रोज मार्टिन, इस्रोचे संचालक पद्मश्री मल्लय्य स्वामी, अण्णादुराई आदी मान्यवर उपस्थित होते. कलाम फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी व महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या वेळी देशभरातील शास्त्रज्ञ व विद्यार्थी उपस्थित होते.
ऋतूच्या या उत्तुंग भरारीचे कौतुक करण्यासाठी गुरुवार (दि.४ मार्च) रोजी विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे विश्वस्त प्रा. ऋषिराज सावंत यांच्या हस्ते ऋतुजा व तिच्या आई-वडिलांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ऋतुजा म्हणाली की, मी तयार केलेला उपग्रह अवकाशात गगन भरारी घेतानाचा क्षण आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय क्षण आहे. तसेच शिक्षिका असलेल्या तिची आई माधुरी शेजवळ म्हणाल्या की, पालकांनी मुलांना फक्त बळजबरीने अभ्यास करायला लावण्यापेक्षा त्यांच्या जन्मजात कलागुणांकडे लक्ष द्यावे.
ऋतूजाच्या विज्ञान क्षेत्रातील या गगनभरारीचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. तानाजीराव सावंत साहेबांनी कौतुक केले आहे. संकुलप्रमुख डॉ. एस. एन. पाटील, डॉ. विवेक कायंदे, भिवराबाई सावंत तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन आदमाने, विद्यालयाच्या प्राचार्या रिज्जू कोथाट, उपप्राचार्या शिल्पा उनानी समन्वयक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून ऋतूजाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
फोटो ओळ : ऋतुजा शेजवळ हिचा सन्मान करताना संस्थेचे विश्वस्त ऋतुराज सावंत यांचेसह व संकुल संचालक एस. एन. पाटील व विवेक कायंदे.