मनाने पाखरू होत पशु-पक्ष्यांची भूक भागवा : रामदास थिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:50+5:302021-03-13T04:17:50+5:30
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ शिरूर आणि वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था यांच्या वतीने समाज माध्यमाद्वारे एक ...
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ शिरूर आणि वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था यांच्या वतीने समाज माध्यमाद्वारे एक घास चिऊसाठी उपक्रमाअंतर्गत धान्य जमा करण्याचे आवाहन केले होते. यावेळी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने युवकांनी एकत्रित येत पक्ष्यांसाठी धान्य दिले.
भीषण उन्हाळा, झाडांचे अस्तित्व कमी होत असताना, पाणीटंचाई नजरेसमोर येताच ‘अशी पाखरे येती’ हे पाहून बरे वाटते. या चिमण्या, कावळे, कबुतरे आणि अन्य पक्षांकरिता ‘एक घास चिऊचा-काऊचा ' हा उपक्रम घेत पुढे येणारे पक्षीमित्र प्रविणकुमार जगताप आणि शेरेखान शेख यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य रामदास थिटे यांनी सांगितले.
आजच्या ‘एक घास चिऊताई साठी’ या उपक्रम प्रसंगी केले.
विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा धार्मिक, तंत्रज्ञान, गड- किल्ले मोहीम आदी उपक्रमात सहभागी असणारा शिक्रापूर येथील मॉर्निंग समूह एकत्र आला आणि प्रत्येक आठवड्यास पक्ष्यांसाठी चारा व पाणी नियोजन करण्याचा संकल्प कायम केला आहे. शिक्रापूर येथे उपक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी उद्योजक बाळासाहेब गुंजाळ, उत्तम सासवडे, प्रसाद रासकर, प्राध्यापक शामराव साळुंके, डॉ. सतिश बनकर सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब लकडे, ओंकार जासूद, ओम गुंजाळ आदीं मान्यवर उपस्थित होते. विशेषता: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, शिरूर आणि वन्यजीव पशु संरक्षण सामाजिक संस्था यांच्यावतीने ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी, विठ्ठलवाडी या परिसरामध्ये प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ क-हेकर, दीपक भुजबळ यांनीही एक घास चिऊसाठी उपक्रमांतर्गत धान्य दिले.
(फोटो ओळ - शिक्रापूर येथील " मॉर्निंग कट्टा " व्दारे एक घास चिऊसाठी उपक्रमाअंतर्गत धान्य देताना सदस्य)