मुळशी तालुका इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतीश कारंजकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:08+5:302021-04-14T04:10:08+5:30
शासनाकडे नव्याने नोंदणीकृत केलेल्या या इंडस्ट्रीयल असोसिशनच्या अध्यक्षपदी ब्रिन्टन कार्पेटचे व्यवस्थापक सतीश कारंजकर तर सचिवपदी इंडोशॉटलच्या एचआर सुगंधा तनेजा ...
शासनाकडे नव्याने नोंदणीकृत केलेल्या या इंडस्ट्रीयल असोसिशनच्या अध्यक्षपदी ब्रिन्टन कार्पेटचे व्यवस्थापक सतीश कारंजकर तर सचिवपदी
इंडोशॉटलच्या एचआर सुगंधा तनेजा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
असोसिएशनचे साधारणतः दीडशे सर्वसाधारण सभासद असून संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीत रमन गोवित्रीकर सहसचिव, देवेंद्र चौधरी कोशाध्यक्ष म्हणून तसेच रवींद्र घेवडे, तानाजी काळे, नारायण कुलकर्णी हे सदस्य सदस्य असणार आहेत.
मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व सदाशिव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन मिटिंगद्वारे ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . सचिव सुगंधा तनेजा यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले तर सतीश कारंजकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना कारंजकर म्हणाले की, मुळशी तालुक्यात लहान व मोठ्या अशा एकूण सातशेहून अधिक कंपन्या आहेत. गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांहून अधिक काळ उलटला तरी तालुक्यातील अनेक कंपन्यांचे वीज,पाणी, रस्ते हे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत. कंपन्यांच्या अडचणी सोडवायच्या असतील तर सर्व कंपन्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता मुळशी इंडस्ट्रीयल असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी पुणे इंडस्ट्रीज विभागाचे डायरेक्टर सदाशिव सुरवसे यांनी असोसिएशनच्या माध्यमाने कोणती कामे करता येतील व ती कशी मार्गी लावता येतील याबाबत मार्गदर्शन केले.