Pune Crime: मावस भावालाच सत्तूरचा दाखविला धाक, गल्ल्यातून रोकड चोरली
By विवेक भुसे | Updated: September 18, 2023 15:28 IST2023-09-18T15:28:04+5:302023-09-18T15:28:32+5:30
हा प्रकार घोरपडे पेठेतील खेडेकर भाजी मार्केटजवळील गुडलक मटण शॉपमध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली....

Pune Crime: मावस भावालाच सत्तूरचा दाखविला धाक, गल्ल्यातून रोकड चोरली
पुणे : आपल्याच मावस भावाच्या दुकानात शिरुन त्याने सत्तूरचा धाक दाखवून शिवीगाळ केली. दुकानातील गल्ल्यामध्ये हात घालून १५ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. याबाबत सोहेल नईम शेख (वय २५, रा. भिमपूरा, कॅम्प) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शार्जील ऊर्फ शाला लतीफ शेख (वय ३०) याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडे पेठेतील खेडेकर भाजी मार्केटजवळील गुडलक मटण शॉपमध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्जील शेख हा फिर्यादी यांचा मावस भाऊ आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. फिर्यादी हे दुकानात असताना शार्जील तेथे आला. त्याने सत्तूरचा धाक दाखवून जबरदस्तीने गल्ल्यातील १५ हजार रुपये घेऊन तो निघून गेला. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.