दोन मिनिटांनीच पाहिली सत्त्वपरीक्षा

By admin | Published: July 25, 2016 01:01 AM2016-07-25T01:01:44+5:302016-07-25T01:01:44+5:30

प्रवेशपरीक्षेच्या दिवशी अवघ्या दोन मिनिटांच्या उशिरामुळे सिटी इंटरनॅशनल स्कूल नीट परीक्षा केंद्रावर पाच ते आठ नीट परीक्षारार्थींना प्रवेश नाकारल्याची घटना रविवारी घडली़

Sattva exams seen only after two minutes | दोन मिनिटांनीच पाहिली सत्त्वपरीक्षा

दोन मिनिटांनीच पाहिली सत्त्वपरीक्षा

Next

पिंपरी : प्रवेशपरीक्षेच्या दिवशी अवघ्या दोन मिनिटांच्या उशिरामुळे सिटी इंटरनॅशनल स्कूल नीट परीक्षा केंद्रावर पाच ते आठ नीट परीक्षारार्थींना प्रवेश नाकारल्याची घटना रविवारी घडली़ यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची भावना आहे़
मेडिकल अभ्यासक्रमाची नीट प्रवेश परीक्षा रविवारी विविध केंद्रांवर घेण्यात आली़ ही परीक्षा सकाळी दहाला सुरू होणार होती़ त्यासाठी परीक्षार्थींना साडेनऊपर्यंतच परीक्षा हॉलमध्ये सोडले जाणार होते़ सिटी इंटरनॅशनल स्कूल नीट परीक्षा केंद्रावर ४६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते़त्यांपैकी आठ विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले़ विलंबाने आल्यामुळे त्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यास मज्जाव करण्यात आला़
विनवणी करूनही न सोडल्याने पाच विद्यार्थी निघून गेले़ सुदर्शन सानप याच्यासह शीतल पांडे, वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनी तेथेच थांबल्या़ अवघ्या दोन मिनिटांचा उशीर झाला म्हणून परीक्षेला बसू दिले जात नाही, हे अन्यायकारक आहे़ वारंवार विनंती करूनही परीक्षा केंद्राच्या समन्वयकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही़ राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून परीक्षा देण्यासाठी
आलेले विद्यार्थी केंद्रावर दाखल झाले; पण केंद्र समन्वयकांनी माणुसकी दाखवली असती, तर विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रवेशासाठी वर्षभर रंगवलेले स्वप्न सत्यात उतरण्यास मदत झाली असते, असे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले़
याबाबत शीतल पांडे कोपरगावहून रात्रभर प्रवास करून मेडिकलची पूर्वपरीक्षा देण्यासाठी शहरात आली होती़ पण, वाहतूककोंडी आणि हॉल तिकिटावरील चुकीचा पत्ता यामुळे अवघे दोन मिनिटे उशीर झाला़
विनंती करूनही मला परीक्षाकेंद्रात प्रवेश मिळाला नाही, असे तिने सांगितले़ मेडिकल पूर्वपरीक्षेवेळी विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनिटे
पेपर सुरू होण्याआधी मोकळीक दिल्यास थोडा वेळ उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे़ याबाबत सिटी इंटरनॅशनल केंद्राचे परीक्षाप्रमुख बोलण्यासाठी ते उपलब्ध झाले नाही़
विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले. यातून कोणता मार्ग काढावा याबाबत त्यांच्यात चर्चा सुरू होती.(प्रतिनिधी)

Web Title: Sattva exams seen only after two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.