शनिवारी १३४ कोरोनाबाधित : २८७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:17+5:302021-09-12T04:14:17+5:30
पुणे : शहरात शनिवारी १३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात शनिवारी १३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ८७९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १़ ९४ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ६७ इतकी आहे. आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ जण हे पुण्याबाहेरील आहे़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २१५ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख २७ हजार ३३६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९७ हजार ९८७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८६ हजार ९४७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९७३ जणांचा मृत्यू झाला आहे.