शनिवारी २११ बाधित, तर ३०२ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:21+5:302021-06-20T04:09:21+5:30
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात २११ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३०२ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयांतील ३८७ ...
पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात २११ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३०२ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयांतील ३८७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २ हजार ५५९ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ५८५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ५२४ झाली आहे. पुण्याबाहेरील ९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३०२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४ हजार ५०५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७५ हजार ५८८ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ५५९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ७२४ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २६ लाख १० हजार ४१२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.