शनिवारी २२६ बाधित, तर ३३५ झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:49+5:302021-06-27T04:08:49+5:30

पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात २२६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा ...

On Saturday, 226 were affected, while 335 were cured | शनिवारी २२६ बाधित, तर ३३५ झाले बरे

शनिवारी २२६ बाधित, तर ३३५ झाले बरे

Next

पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात २२६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ४०८ सक्रिय रुग्ण आहेत.

खासगी तसेच शासकीय स्वॅब तपासणी केंद्रांवर ५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५. ३ टक्के होती. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील शनिवारचा मृत्यूदर हा १. ८ टक्के इतका आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३०९ रुग्ण गंभीर असून ४३५ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ४६ हजार ४४९ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७७ हजार ३१० नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६६ हजार ३३७ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

Web Title: On Saturday, 226 were affected, while 335 were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.