शनिवारी २६० कोरोनाबाधित, ३३५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:11+5:302021-08-01T04:11:11+5:30
पुणे : शहरात शनिवारी २६० नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात ३३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आजमितीला शहरात ...
पुणे : शहरात शनिवारी २६० नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात ३३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आजमितीला शहरात २ हजार ४९६ सक्रिय रुग्ण आहेत़
आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ४५० संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ३.०७ टक्के इतकी आहे. आज १४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८१ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२० इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ८१ हजार २८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८७ हजार १६५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७५ हजार ९०२ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७६७ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------